मोडी आजच्या जगात | Modi In Today's World

<=मागे 


मोडीचा आजच्या जगात अनेक प्रकारे वापर करता येतो. जसे  मोडी फॉंट आपण संगणकावर वापरू शकतो, मोडी सुलेखन करून आपले हस्ताक्षर सुधारू शकतो ( जुन्या काळात ज्याला पुस्ती म्हणत.), चित्रकला, रांगोळी, वेगवेगळे  नमुने, परिकल्प यांमध्ये मोडी वापरू शकतो, इत्यादी. त्यापैकी काही उदाहरणे आपण खाली पाहू.


फॉंट
मोडी लिपीसाठी MihailJP यांनी येथे मोफत मोडी फॉंट उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही कोडर असाल आणि मोडीसाठी काही करायची इच्छा असेल तर या गीटहबवर तुम्ही आपले योगदान देऊ शकता. 
कौस्तुभ  कस्तुरे यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक फॉंट सामायिक केला आहे.
मोडी खिलारी फॉन्ट तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.
मोडी हेमाद्री फॉन्ट तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.

सध्याचा  माझ्या आवडता  मोडी फॉन्ट नोटो  मोडी सांस  तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.  

या फॉंट्सचा लाभ घेऊन तुम्ही संगणकावरही मोडी लिपीत लिहू शकता.

कला
त्याच प्रमाणे पिंटरेस्ट या साईटवर अनेक लोकांनी आपली कला सदर केलेली आहे, त्यातून प्रेरणा घेऊ शकता.

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी मोडी लिपीत अत्यंत सुरेख सुलेखन केले आहे. ते तुम्ही इथे बघू शकता.

No comments:

Post a Comment