ऑनलाइन मोडी! | 𑘌𑘡𑘩𑘰𑘃𑘡 𑘦𑘻𑘟𑘱!

 सध्या 20 वर्षे किंवा जास्त वय असलेल्यांना 2009-10  चं  वेबजगत आठवतं? संगणक वापरुन इंटरनेट तेव्हा थोडे रूढ झाले होते अन मोबाइल वापरुन इंटरनेट छोटी छोटी पावले टाकत पुढे जात होते.  

तेव्हा मराठी लिपी  आणि भाषा अजून यूनिकोड मध्ये  यायची होती. मराठी टाइप करणे एक दिव्यच  असायचं. बरं लिहून झालं  तर कोणाला बरोबर वाचता येईल याची पान खात्री नव्हती. त्यामुळे वाचणाऱ्याच्या संगणकात वा फोन मध्ये तो  फॉन्ट नसला तर अक्षरे इकडून तिकडे दिसायची अन अर्थाचा अनर्थ व्हायचा. मराठी लिहिलं आहे तिथे रिकामे चौकोन दिसणे ही तर साधारण गोष्ट होती. काळ  बदलला आणि मराठी यूनिकोड मध्ये लिपीबद्ध झाली. आता आपण कोणत्या पान साधनाने मराठी वाचू लिहू शकतो. वेगवेगळे फॉन्टस पान उपलब्ध झाले आहेत. 

2016 मध्ये हा ब्लॉग मी सुरू केला तेव्हा याचं स्वरूप थोडं वेगळं होतं. जुने हस्तलिखित वाचायला मोडी शिका हे सगळेच म्हणतात. पण या सध्याच्या जगात वापरायला मोडी शिका असं कोणी म्हणत नाही. सध्याच्या काळाला सुसंगत एवढीच बेसिक मोडी शिकवायला मी हा ब्लॉग सुरू केला. बाकी ज्याला गोडी  वाटून जुनी कागदपत्रे वाचावीशी वाटली तर अति उत्तम! पण  तेव्हा मोडी यूनिकोड असून पण  वापरात यायची होती अन पूर्वी मराठी टाइप करायला जो त्रास व्हायचा तोच त्रास मोडीला व्हायचा. अनेकांनी चांगले मोडी फॉन्ट बनवले होते पण ते ऑनलाइन दिसत नसत. 

परंतु आता मात्र तुम्ही गूगल वगैरेंनी मोडी फॉन्ट काढल्यापासून कोणत्या पण साधनावर मोडी लिपी दिसू शकते.  कुठलाही फॉन्ट वगेरे डाउनलोड करायची गरज नाही.  येथे उपलब्ध असलेला नोटो मोडी सांस  बहुतांश फोन /संगणक यांवर दिसतो आणि दिसत नसेल तर मोफत डाउनलोड करू शकता. लिहायचं असेल तर प्रमुखआयएमई  वर टाइप करून कुठे पण कॉपी पेस्ट करा! जशी जशी यात प्रगती हॉट जाईल तशी तशी आपली मोडी लिपी गूगल मायक्रोसॉफ्ट यांच्या कळफलकावर पण उपलब्ध होईल. सध्याचा मोडी फॉन्ट खूप बाळबोध वाटतो पण भविष्यात त्यात कठीण मोडी जोडाक्षरेसुद्धा लिहिता येतील!

𑘕𑘨𑘱 𑘦𑘻𑘚𑘱 𑘎𑘰𑘩𑘭𑘳𑘭𑘽𑘐𑘝 𑘪𑘿𑘮𑘪𑘱 𑘀𑘫𑘱 𑘦𑘰𑘖𑘱 𑘃𑘓𑘿𑘔𑘰 𑘀𑘭𑘩𑘱 𑘝𑘨𑘱 𑘦𑘱 𑘀𑘭𑘽 𑘎𑘠𑘱 𑘘𑘰𑘂𑘢 𑘎𑘨𑘳 𑘫𑘎𑘱𑘡 𑘀𑘭𑘰 𑘦𑘱 𑘭𑘿𑘪𑘢𑘿𑘡𑘰𑘝 𑘢𑘜 𑘪𑘱𑘓𑘰𑘨 𑘡𑘭𑘹𑘩 𑘎𑘹𑘩𑘰!

मोडी लिपीसाठी ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न केले आहेत असे मोडी शिक्षक/ कलाकार/ डिझायनर/ प्रोग्रॅमर अशा सर्वांचे मनापासून आभार. अच्युत गोडबोले यांच्या शब्दांत बोलायचे झाल्यास 'नाही रे उजाडत' पासून आहे 'रे उजाडत' पर्यंतचा प्रवास सोपा नाही, परंतु अशक्य पण नाही. कागदावर नाही तर स्क्रीन वर, मोडी लिपीचे वैभव तिला पुन्हा परत मिळो हीच प्रार्थना. 



No comments:

Post a Comment